पालघर- आतापर्यंत 'इलाका तुम्हारा-धमाका हमारा' असे होते. मात्र, लोकसभेनंतर 'इलाका हमारा-धमाका हमारा' असे झाले आहे. त्यामुळे येथील गुंडगिरी आम्ही मोडून काढू, असे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त नालासोपारा येथे बोलताना आदित्य ठाकरे पालघर : आदित्य ठाकरेंच्या 'जनआशीर्वाद'साठी एका रात्रीत बुजवले रस्त्यांवरील खड्डे
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा नालासोपारा येथील तुळींज रोड शादी डॉट कॉममध्ये आली होती. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघरमधील गुंडगर्दी नाहीशी करायची आहे, असे आदित्य म्हणाले.
प्रदीप शर्मांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कुणकुण !
वसईत विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. गेल्या २५ वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची वसई-विरार शहरावर एक हाती सत्ता आहे. मात्र, ठाकुरांचा हा गड जिंकण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नालासोपाऱ्यात एन्काऊंटर स्पेशालिस्ट तथा माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उतरविणार आहेत. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांनी यापुढेही मी पोलीस अधिकारी म्हणूनच काम करेन, अशी माहिती दिली होती. त्यातच शनिवारी रात्रीपासून वसई विरार शहरातमध्ये अनेक रहदारीच्या ठिकाणी 'चोर की पोलीस?' असे बॅनर लावण्यात आले आहेत. तर, निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदीप शर्मा नालासोपऱ्यात तळ ठोकणार असल्याने विरोधकांसह मतदारांना उकसविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अशी बॅनरबाजी केली असल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना आदित्य म्हणाले, की बॅनर कोणी लावले माहिती नाही. मात्र, काहीतरी विचार करूनच बॅनर लावले असतील.