पालघर - महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने बहुतांश जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी युवासेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मार्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये तरुण-तरुणींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा; युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - ex minlitry
महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने बहुतांश जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तरीदेखील शासनामार्फत फक्त काही गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी काही प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या ३ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या ३ तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातही दुष्काळीची परिस्थिती आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष राजेश शहा, जगदीश धोडी, वसंत चव्हाण, केतन पाटील, महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना परीक्षित पाटील, पालघर जिल्हा युवासेना विस्तारक राहुल लोंढे, जिल्हा युवा अधिकारी जश्विन घरत, पालघर शहर युवा अधिकारी निमिश पाटील, जितेंद्र पामाळे आदी पदाधिकाऱ्यांसह युवासेना- युवतीसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.