महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : विरारच्या लसीकरण केंद्रात तरुणांनी केला राडा - पालघर लेटेस्ट न्यूज

लसीकरणादरम्यान पालिका अधिकारी व कर्मचारी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांनी लसीकरण केंद्रातच पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी करत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.

विरार राडा
विरार राडा

By

Published : May 12, 2021, 8:24 PM IST

Updated : May 12, 2021, 9:03 PM IST

विरार (पालघर) - 1 मेपासून सुरू झालेल्या 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेला पालिकेचा कारभार तरुणांच्या टिकेचा धनी होत आहे. विरारमधील लसीकरणात संतप्त तरुणांनी लसीकरणात होत असलेल्या संशयास्पद कारभाराविरोधात केंद्रातच राडा केला आहे. पालिका कर्मचार्‍यांना शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे लसीकरण केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून विरार पोलीस ठाण्यात भादंविक 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.

विरारच्या लसीकरण केंद्रात तरुणांनी केला राडा


मारुती उर्फ सनी पेडणेकर, चेतन चव्हाण, धनाजी पवार आणि भारत उर्फ मोहन सिंग यांच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार शहरातील राले तलाव येथील लसीकरण केंद्रावर तरुणांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, लसीकरणादरम्यान पालिका अधिकारी व कर्मचारी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांनी लसीकरण केंद्रातच पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी करत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. 25 लाख लोकसंख्येच्या महापालिका क्षेत्रात सध्यस्थितीत केवळ 3 लसीकरण केंद्र वालीव (अग्रवाल कोविड सेंटर), बोळिंज आणि वसई पश्चिममेतील सर डी. एम. पेटिट रूग्णालयात सुरू आहेत. दररोज याठिकाणी लसीकरण करून घेण्यासाठी शेकडो तरुणांची गर्दी उसळते. ऑनलाइन नोंदणी केलेली असतानांही अनेक तरुणांना पालिकेकडे मात्र नोंदणीच नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत तरुणांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच काल विरार येथील लसीकरण केंद्रात त्याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले.

हेही वाचा -नामांकित लॅबच्या नावे बनावट कोविड निगेटिव्ह अहवाल देणारी टोळी गजाआड

Last Updated : May 12, 2021, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details