पालघर- विरार पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या खाणीवडे गावात एका अज्ञात माथेफिरुने सदनिकेत शिरुन घरातील चार सदस्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
माहिती सांगताना प्रत्यक्षदर्शी घरातील चार सदस्यांवर केले धारदार शस्त्राने वार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. 13 मार्च) सकाळच्या सुमारास खणीवडे येथील नवनीत कंपनीमध्ये काम करणाऱ्या माथेफिरू तरुणाने गावातील राजेश तरे यांच्या घरात धारदार शस्त्रासह प्रवेश केला. घरातील सदस्यांवर हल्ला करू लागला. इतर सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही त्याने चाकू हल्ला केला.
भीतीपोटी स्वतःच्या हाताची कापून घेतली नस
दरम्यान, अनेक गावकरी सदनिकेबाहेर जमले या भीतीने आरोपीने स्वतःला बाथरुममध्ये कोंडून स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. या घटनेत जखमी झालेल्या तरे कुटूंबियांना व आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. प्रेम प्रकरणावरून हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या प्रकरणाचा अधिक तपास विरार पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -वसईतील सातीवली खिंडीत जंगलाला आग
हेही वाचा -तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर तलासरी पोलिसांची कारवाई