महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जोरदार पाऊस, वीज कोसळून तरुण जखमी - palghar rain news

पालघरमध्ये बुधवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे वाडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच वीज अंगावर कोसळल्याने एक जण जखमी झाला आहे.

फाईल फोटो

By

Published : Sep 19, 2019, 8:45 PM IST

Updated : Sep 19, 2019, 9:00 PM IST

पालघर - जिल्ह्यात बुधवारपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये वाडा तालुक्यातील बुधावली गावात एक ३५ वर्षीय तरुण अंगावर वीज कोसळल्याने जखमी झाला आहे. पिंट्या शेलार, असे त्या तरुणाचे नाव आहे.

पालघर जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासुन पावसाची जोरदार बँटींग

पिंट्या विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना घराबाहेर पडला. त्यातच तो उभा असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये तो जखमी झाला असून त्याला वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान

दरम्यान, गुरुवारी पावसाने विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दुष्काळी माण खटावसह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

Last Updated : Sep 19, 2019, 9:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details