पालघर - पालघरमध्ये दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तपन भिसे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
दुचाकीच्या अपघातात एक तरुण ठार; एक जखमी - पालघर ताज्या बातम्या
अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंड परिसरात शुक्रवारी सायंकाळी दुचाकीचा भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
![दुचाकीच्या अपघातात एक तरुण ठार; एक जखमी palghar bike accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8943724-1040-8943724-1601098873313.jpg)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंड परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात घडला. भरधाव दुचाकी महामार्गावरील रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला असून, या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. तपन भिसे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, तो पालघर तालुक्यातील सफाळे येथील रहिवासी आहे. जीत पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला मनोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.