महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणाला नडला दुचाकी चालवण्यासाठी चोरीचा छंद, 10 दुचाकी जप्त - vasai latest news

चोरी केलेल्या दहा दुचाकी वसईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी जप्त केलेल्या असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वसई तालुक्यातील पाच पोलीस ठाण्यांतर्गत लॉकडाउनच्या काळात त्याने दुचाकी चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत.

तरुणाला नडला दुचाकी चालवण्यासाठी चोरीचा छंद
तरुणाला नडला दुचाकी चालवण्यासाठी चोरीचा छंद

By

Published : Oct 31, 2020, 1:31 PM IST


पालघर/वसई - विरारमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय आरोपी तरुणाला दुचाकी चालवण्याचा छंद नडला. त्याने चोरी केलेल्या दहा दुचाकी वसईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी जप्त केलेल्या असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वसई तालुक्यातील पाच पोलीस ठाण्यांतर्गत लॉकडाउनच्या काळात त्याने दुचाकी चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत.

वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यात दररोज दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येऊन गुन्हे दाखल होत होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. वसईच्या क्राईम ब्रँच या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्याबद्दल माहिती मिळाली त्यात माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सदर आरोपीवर पाळत ठेवून होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रेल्वे स्थानकाबाहेरील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अमर रमजान शेख (१९)असे आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी सांगितले की, आरोपी हा एकटाच चोरी करायचा. आतापर्यंत दहा दुचाकी मिळाल्या असून अजूनही मिळतील. आरोपीची आई जोगेश्वरी येथे राहत असून मध्यंतरी आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिला भेटण्यासाठी आणि नशा करण्यासाठी हा दुचाकी चोरी करायचा मुंबईला जाताना हा कोणतीतरी दुचाकी चोरी करून घेऊन जायचा आणि तिचे पेट्रोल संपले कि ती दुचाकी रस्त्यात सोडून दुसरी दुचाकी चोरी करून पुढे जायचा. गाड्या विकण्याचा त्याचा धंदा नव्हता. घाटकोपरच्या जेलमधून लॉकडाउनच्या काळात सुटला होता. तो विरारला पत्नीसह रहातो. त्याच्यावर नालासोपारा, अर्नाळा , नवघर, विरार, तुळिंज या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details