पालघर - केळवे येथे राहणार्या २८ वर्षीय तरुणाने डोळे बंद करून सर्वात जलद भाजी कापण्याचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाची 'लिमका बुक ऑफ रेकॉर्ड' यात नोंद करण्यात आली आहे. विमल राधेश्याम राजोरिया असे या तरुणाचे नाव आहे.
डोळेबंद करून सर्वात जलद भाजी कापण्याचा विक्रम; पालघरच्या तरुणाची 'लिमका बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये पंचांच्या समक्ष विमलने राजोरीया याने डोळे बंद करून ३० सेकंदात गाजराच्या ९२ चकत्या केल्या. तसेच १ इंच लांबीच्या काकडीच्या १०.३३ सेकंदात ३२ चकत्या करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला. यामुळे विमलच्या नावे डोळे बंद करून सर्वात जलद भाजी कापण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे. लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाल्याबाबतचे प्रशस्तिपत्र विमलला काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे.
विमल राजोरिया या तरुणाच्या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून सराव -
पालघर तालुक्यातील केळवे येथील रहिवासी असलेल्या विमलने बीएससी बायोटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणी विमलचे वडील राधेश्याम यांनी विमलला जीवनात वेगळेपणा करुन नाव करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याची आई मीरा यांनीदेखील टीव्हीवरील शोमध्ये अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय विक्रम होत असतानाचे दाखवून विमलला प्रेरणा दिली. त्यानंतर काही वेगळे करून दाखवण्याच्या इच्छा असलेल्या विमल गेल्या दोन वर्षांपासून डोळे बंद करून जलद गतीने भाजी कापण्याचा सराव करत होता. त्याच्या या मेहनत आणि सरावाला यश प्राप्त झाले आहे.
विमलच्या या विक्रमाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याने त्याचे कौतुक होत आहे. तर असाच सराव पुढे चालू ठेवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील विक्रम नोंदवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया विमलने 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली.