पालघर -पालघर जिल्ह्यातील सूर्या कालव्यात एक 17 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. जाफर अली असे या तरुणाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सूर्या कालव्यात तरुण बुडाला, शोधकार्य सुरू - पालघर जिल्हा लेटेस्ट न्यूज
पालघर जिल्ह्यातील सूर्या कालव्यात एक 17 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. जाफर अली असे या तरुणाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सूर्या कालव्यात तरुण बुडाला, शोधकार्य सुरू
सूर्या कालव्यात तरुण बुडाला, शोधकार्य सुरू
शोधकार्य सुरू
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण चारोटी परिसरामध्ये राहत होता. हा तरुण आपल्या मित्रांसोबत अंघोळीसाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास या कालव्यामध्ये गेला. मात्र पाण्याचा आंदाज न आल्याने हा तरुण पाण्यात बुडाला, दरम्यान अद्यापपर्यंत या तरुणाचा शोध लागला नसून, त्याला शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Last Updated : Feb 5, 2021, 10:35 PM IST