वाडा (पालघर) - जिल्ह्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या ओडिशातील 202 मजूरांना आज (शनिवारी) त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले. काही मजुरांना रेल्वेने तर काहींना बसमधून पाठवण्यात आले. पालघर रेल्वे स्थानकातून त्यांनी रवानगी करण्यात आली.
कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे मजूर याठिकाणी अडकले होते. हे मजूर वाडा तालुक्यातील कुडूस येथे कामाला होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होती, अशी माहिती तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली. यासोबतच तालुकयातील वसुरी येथील कॅम्पमधील 26 मजुरांना ही राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसने तेलंगाणा राज्यात रवाना करण्यात आले. तालुक्यातील अजून काही अडकलेल्या मजुरांना पाठविण्याची प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती तहसीलदार कदम यांनी दिली.