पालघर - अखिल भारतीय जनवादी महिला संघटना ठाणे-पालघरच्यावतीने डहाणू प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रेशन, पाणी, आरोग्य सुविधा, मनरेगा खाली रोजगार, खावटी अनुदान आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
डहाणू तालुक्यातील महिलांचा मोर्चात सहभाग-
पालघर जिल्ह्यातील तलासरी व डहाणू तालुक्यातील महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या लहानी दौडा, प्राची हातिवलेकर, सुनीता शिंगडा, सविता डावरे, स्मिता वळवी, रमा तारवी, संगीता ओझरे, संती मलावकर, लता घोरखाना, मेरी रावते आदींंनी केले.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा:-
कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एवटला आहे. गेल्या एक महिन्याने अधिक काळापासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांच्या मनात या काद्याविषयी काही शंका आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजपा सरकार जाहिरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. हे शेतकरी विरोधी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी मार्चाच्या माध्यमातून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे.
हेही वाचा-रत्नागिरी : सेल्फी काढताना हेदवी किनाऱ्यावर दोन पर्यटक बुडाले