पालघर/वसई :पश्चिम रेल्वेच्या सिग्नल विभागात काम करणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून छळाचा महिला कर्मचाऱ्याचा आरोप आठ वर्षांपासून छळाचा महिलेचा आरोप
राजीव कुमार मंडल असे आरोपीचे नाव असून महिलेने दिलेल्या तक्रारीत वरिष्ठांकडून गेल्या आठ वर्षांपासून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. आरोपीने अनेकवेळा महिलेला कामावर असताना असताना तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य अनेकवेळा केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. याविषयी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडूनही मदत मिळत नसल्याने अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे महिलेने म्हटले आहे.
दीपाली चव्हाण यांच्याप्रमाणे जीवन संपविण्याची भावना
वरिष्ठांच्या जाचाला आपण इतके कंटाळलो होतो की, तिने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण धैर्याने या प्रकरणाची तक्रार दाखल केल्याचे महिलेने म्हटले आहे. आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जसे आत्महत्येचे पाऊल उचलले होते तसेच मलाही आपले जीवन संपवावे लागले असते अशीही भावना पीडित महिलेने व्यक्त केली आहे.