महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Women death due to WhatsApp status : व्‍हॉट्‍सअप स्टेटसने झालेल्या वादात महिलेचा मृत्यू - Women death due to WhatsApp status

पालघर तालुक्यातील बोईसर- शिवाजीनगर परिसरात रहिवासी ( Boisar police station ) असलेल्या लीलावती देवी प्रसाद यांच्‍या मुलीने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सपवर स्टेट एक ठेवला होता. यावरुन कॉलेजमध्ये तिचे भांडण ( fight over whatsapp status ) झाले. वादात महिलेचा मृत्यू झाला आहे.

बोईसर महिला मृत्यू
बोईसर महिला मृत्यू

By

Published : Feb 14, 2022, 5:07 PM IST

Updated : Feb 14, 2022, 10:10 PM IST

पालघर -व्‍हॉट्‍सअप स्‍टेटसमुळे झालेल्या वादात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. बोईसर-शिवाजीनगर येथे ही धक्कादायक ( woman death in Boisar Shivajinagar ) घटना घडली आहे. व्हॉट्सअप स्टेटसमुळे झालेल्या वादात एका कुटुंबातील मुलींसह आईला मारहाण करण्यात आली. यामध्‍ये आईला जीव गमवावा लागला आहे. लीलावती देवी प्रसाद (वय ४८ ) असे मृत महिलेचे ( Lilavati Devi Prasad death ) नाव आहे.

व्हाट्सअप स्टेटस वरून झाला वाद-
पालघर तालुक्यातील बोईसर- शिवाजीनगर परिसरात रहिवासी ( Boisar police station ) असलेल्या लीलावती देवी प्रसाद यांच्‍या मुलीने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सपवर स्टेट एक ठेवला होता. यावरुन कॉलेजमध्ये तिचे भांडण ( fight over whatsapp status ) झाले. या भांडणाचे पडसाद तिच्या राहत्या घरी थेट शिवाजीनगर येथील वस्तीमध्ये उमटले. १० फेब्रुवारी रोजी प्रसाद यांच्या कुटुंबातील मुली व त्यांची पत्नी लीलावती देवी यांना काही जणांनी जबर मारहाण केली.

व्‍हॉट्‍सअप स्टेटसने झालेल्या वादात महिलेचा मृत्यू

हेही वाचा-Dance Bar Raid in Nagpur : डान्सबारवर पोलिसांचा छापा, बार मालकावर गुन्हा दाखल
मारहाणीत महिलेचा मृत्यू -
व्हाट्सअप स्टेटसच्या वादातून झालेल्या मारहाणीत लीलावती देवी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना बोईसर येथीलच तुंगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान लीलावती देवी प्रसाद यांचा 12 फेब्रुवारी मृत्यू झाला. गुन्हा दाखल होऊन आरोपींवर कारवाई होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे परिसरात काहीसे तणावाचे वातावरणदेखील निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी योग्य ती समजूत काढल्यानंतर कुटुंबाने लीलावती देवी यांचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना 13 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.

मृत महिलेच्या मुलीने आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा-Nashik Crime : सोबत आलेल्या चिमुकलीला वडिलांनी घरी जाण्यास सांगितले, घडली धक्कादायक घटना

Last Updated : Feb 14, 2022, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details