विरार (पालघर) -लोकल ट्रेनने प्रवास करता येणार असल्याचे समजताच आज सकाळपासून महिलांनी रेल्वेस्थानकांवर गर्दी केली, मात्र रेल्वेसेवा सुरू होणार नसल्याचे कळल्यावर प्रवासी महिला निराश झाल्या. त्यातच पोलिसांनी या महिलांची अडवणूक केल्याने, त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
प्रवासाला मनाई : पोलिसांच्या अडवणुकीमुळे महिला संतप्त - MAHARASHTRA GOVERMENT
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मुंबईत महिलांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा दिली. त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात रेल्वे बोर्डाने पश्चिम आणि मध्य लोकल सेवा महिलांसाठी सुरू होणार नाहीत, असा निर्णय घेतला. त्यातच स्थानकात जाण्यापासून पोलिसांनी अडवल्यामुळे महिलांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
![प्रवासाला मनाई : पोलिसांच्या अडवणुकीमुळे महिला संतप्त MUMBAI LOCAL NEWS](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9209344-967-9209344-1602925389754.jpg)
महिला रेल्वे प्रवासी
महिला रेल्वे प्रवासी
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात रेल्वे बोर्डाने पश्चिम आणि मध्य लोकल सेवा महिलांसाठी सुरू होणार नाहीत, असा निर्णय घेतला. त्यामुळे महिला प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे. या महिलांशी सवांद साधला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी.