महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ विरार हद्दीत आढळला महिलेचा मृतदेह - woman murder virar palghar

मुंबई अहमदाबाद महामार्गाशेजारी एका महिलेचा मृतदेह आढळला असून, साधारण: ती 35 ते 40 वयोगटातील आहे. या मृतदेहाचे हात पाय एकाच दोरीने बांधून, तीच दोरी गळ्याभोवती आवळलेल्या अवस्थेत मृतदेह होता.

virar police
विरार पोलीस ठाणे

By

Published : Jun 17, 2020, 10:44 AM IST

Updated : Jun 17, 2020, 11:27 AM IST

पालघर/विरार - मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ विरार हद्दीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला आहे. या मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून, तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. विरार हद्दीतील खरड तारा ब्रीजजवळ एका झाडाखाली मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास एक मृतदेह आढळला.

मुंबई अहमदाबाद महामार्गाशेजारी आढळलेला हा मृतदेह साधारण 35 ते 40 वयोगटातील आहे. या मृतदेहाचे हात पाय एकाच दोरीने बांधून, तीच दोरी गळ्याभोवती आवळलेली आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरुन या महिलेवर अत्याचार करुन किंवा अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, याबाबत विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. पण महिलेच्या हत्येचे खरे कारण काय आहे. तिच्यावर अत्याचार झाला आहे किंवा नाही हे पोलिसांच्या अधिक तपासानंतरच समोर येणार आहे. वसई विरार क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा कोरोनाच्या थैमानात एका महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Jun 17, 2020, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details