महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : पतीविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेची पोलिसांनाच मारहाण - महिलेची पोलिसांना मारहाण

वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात कौटुंबीक वादातून पतीची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातच पतीला बघितल्यावर त्याला तिथेच मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

माणिकपूmanikpur police stationर पोलीस
माणिकपूर पोलीस

By

Published : Dec 19, 2019, 8:36 AM IST

Updated : Dec 19, 2019, 12:49 PM IST

पालघर- पतीविरोधात तक्रार करण्यास गेलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातच पती व महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री हा प्रकार घडला.

पतीविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेची पोलिसांनाच मारहाण

हेही वाचा -नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार; मुंबई पोलीस सज्ज

वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादातून पतीची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातच पतीला बघितल्यावर त्याला तिथेच मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी एका महिला पोलीस कर्मचाऱयाने मध्यस्ती करत त्या महिलेला बाहेर बसण्यास सांगितले. मात्र, तक्रार दाखल करण्यास आलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच सुप्रिया पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात खुर्चा तसेच इतर वस्तुंची तोडफोड केली. यावेळी इतरही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

या प्रकरणी पोलिसांनी या महिलेवर भारतीय दंडसंहिता 353 आणि 332 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Dec 19, 2019, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details