पालघर- गरिबीला कंटाळून स्वतःच्या तीन वर्षीय मुलीला फाशी देऊन त्याच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 24 जून) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जव्हार तालुक्यातील देहरे कवडव्याची माळ याठिकाणी घडली आहे.
याबाबत मृत मंगला वाघ यांचे पती दिलीप वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाघ कुटुंबीय रोजंदारीतून आपला उदर निर्वाह करत होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे त्यांच्या हाती काहीच काम मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर मंगला वाघ यांनी बोरीचा माल याठिकाणी स्वतःच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.