महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीला नको होते मुल, बाळाला जन्म देऊन महिलेची आत्महत्या - Woman commits suicide

महिला गर्भवती असताना गर्भपात करावा, अशी तिच्या पतीची मागणी होती. मात्र महिलेला आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. या कारणावरून पती सातत्याने तिला त्रास देत होता.

बाळाला जन्म देऊन महिलेची आत्महत्या

By

Published : Jun 27, 2019, 12:51 PM IST

Updated : Jun 27, 2019, 1:06 PM IST

पालघर- विमा क्षेत्रातील एका अधिकारी महिलेने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. ज्योतिबाला वर्मा असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महिला गर्भवती असताना गर्भपात करावा, अशी तिच्या पतीची मागणी होती. मात्र महिलेला आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. या कारणावरून पती सातत्याने तिला त्रास देत होता.

ज्योतिबाला वर्मा आणि पती विमल वर्मा

या त्रासाला कंटाळून ज्योती पटनाहून वसई येथे आपल्या बहिणीच्या घरी आली. तेथे आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर तीन महिन्यांने तिने आत्महत्या केली. पटना येथील रहिवासी आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती हिचे लग्न नोव्हेंबर २०१७ मध्ये सालिमपुर अहरा येथील विमल वर्मासोबत झाले होते. मात्र त्यानंतर तिच्या माहेरून हुंडा म्हणून १० लाख रुपये आणि कार आणावी तसेच ज्योती गरोदर असताना तिने गर्भपात करावा, म्हणून सासरच्यांनी तिच्यावर दबाव आणला तसेच मारहाणही केली. या सर्व जाचाला कंटाळून ज्योती बहिणीच्या घरी आली. आपल्या मुलाला जन्म दिला, आता हे मुल तीन महिन्यांचे आहे. मात्र जोतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ज्योतिबाला वर्मा आणि पती विमल वर्मा

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने आपल्या सासरच्या लोकांना जबाबदार धरले असून आपल्या मुलाला न्याय मिळावा, असे नमूद केले आहे. ज्योतीचे पती विमल वर्मा, सासरे विजयकुमार, सासू मीराशरण, नणंद दीपा आणि तिचे पती अविनाश, दुसरी नणंद विजेता वर्मा अशा सासरच्या ६ जणांविरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ज्योतीच्या सासरची मंडळी फरार असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वालीव पोलीस ठाणे
Last Updated : Jun 27, 2019, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details