पालघर(वसई) -वसई येथे कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या पतीच्या हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल पत्नी व एक पोलीस राईटर यांच्यासह तिघांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत पती पुंडलिक पाटील यांची पत्नी महिला पोलीस कॉन्स्टेबल हिचे त्याच पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या पोलीस रायटरसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पत्नी व प्रियकर यांनी सुपारी देऊन केली पतीची हत्या -
वसई येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल पाटील व पोलीस रायटर विकास पष्टे यांचे अनैतिक संबंध होते. स्नेहल पाटील हिचे पती पुंडलिक पाटील यांना संपवण्याची सुपारी तिघांना दिली. रिक्षाचालक असलेल्या पुंडलिक पाटील यांच्या रिक्षातून सुपारी घेतलेल्या तिघांनी दोनवेळा मनोर मस्तानाकापर्यंत भाडे घेण्याच्या नावाने प्रवास केला. मात्र, तिसऱ्यांदा प्रवास करताना ढेकाळे गावच्या हद्दीत पुंडलिक पाटील यांच्या डोक्यावर वार करत त्यांची हत्या केली. रिक्षा पलटी करून हा अपघात झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला.