पालघर- जिल्ह्यातील वाडा मनोर महामार्गाजवळील सरो केमिकल कंपनीवर पालघर गुन्हे शाखा आणि अन्न प्रशासन विभाग यांनी छापा टाकला. या संयुक्त कारवाईत 20 लाखाचे विना परवाना हॅण्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले. ही कारवाई पालघर जिल्हा गुन्हे शाखेचे रवींद्र नाईक यांनी केली.
वीस लाखाचे विनापरवाना सॅनिटायझर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - corona effect
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील हमरापुर या ठिकाणी सारो केमिकल कंपनी आहे. या कंपनीत स्विमिंग पुलमध्ये वापरात येणाऱ्या क्लोरीनचे उत्पादन करण्यात येते. याच उत्पादनचा त्यांच्याकडे परवाना होता. मात्र, यावेळी क्लोरीन न बनवता त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरला मागणी असल्याने विना परवाना हॅण्ड सॅनिटायझर बनविण्याचे काम चालू केले होते.

याबद्दलची माहिती मिळताच पालघर गुन्हे शाखा आणि अन्न व प्रशासनाने कंपनीत धाड टाकून बेकायदेशीर सॅनिटायझर ताब्यात घेतले आहे. 4 हजार लहान ड्रम असा एकूण 20लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.