पालघर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, वसई विरार शहरात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री केली जात आहे.
हेही वाचा-मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
मद्यप्रेमीकडून वाटेल त्या किमती उकळून शहरात दारू विक्रीचा चढ्या भावाने धंदा सुरू आहे. याचा फटका सरकारी तिजोरील बसत आहे. त्यामुळे बंद दुकानांमधून होणाऱ्या दारुच्या छुप्या विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरातील वाइन शॉप, बिअर शॉप व बारला सील ठोकून खबरदारीचे पाऊल उचलले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 11 वा दिवस आहे.