महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरज पडल्यास देशासाठी देऊ प्राण; स्वातंत्रता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे मत - Jyoti Harichandra Bhoye

येत्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्रता मिळून 72 वर्ष पुर्ण होतील. दरम्यान या 72 वर्षात देशातील नागरिकांना काय मिळाले आणि येत्या काळात ते देशाच्या विकासाठी काय योगदान देऊ शकतात, या बद्दल 'ईटीव्ही भारत' ने जिल्ह्यातील नागरिकांचे मतप्रवाह जाणून घेतले.

गरज पडल्यास देशासाठी देऊ प्राण

By

Published : Aug 12, 2019, 3:39 AM IST

पालघर (वाडा)- स्वातंत्रता दिवस जवळ येत आहे. येत्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्रता मिळून 72 वर्ष पुर्ण होतील. दरम्यान या 72 वर्षात देशातील नागरिकांना काय मिळाले आणि येत्या काळात ते देशाच्या विकासाठी काय योगदान देऊ शकतात, या बद्दल 'ईटीव्ही भारत' ने जिल्ह्यातील नागरिकांचे मतप्रवाह जाणून घेतले.

गरज पडल्यास देशासाठी देऊ प्राण

याबाबत जिल्ह्याच्या उपाध्यक्षा ज्योती हरीचंद्र भोये यांना मत विचारले अस्ता त्यांनी सांगितले की, 72 वर्षानंतर आज देशातील स्त्रियांचे सक्षमीकरण झाले आहे. स्त्रियांच्या सुरक्षेत वाढ झाली असून सरकारकडून सुरु असलेल्या घरकूल योजना, गॅस योजना यांचा स्त्रियांना फायदा होत आहे. या देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी मदत करु. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास आम्ही लढू.

त्याचप्रमाने या देशावर जी परकीय आक्रमने होत आहे, त्याला आपल्या देशातील सैनिकांकडून सडेतोड उत्तर दिल्या जात आहे. स्वातंत्रता मिळाल्यानंतर ते आजपर्यंत तरुणांनी या देशाची जशी सुरक्षा केली, त्याचप्रमाणे पुढेही ते टिकून राहिल. मात्र आज देशामध्ये वाढती बेरोजगारी ही फार मोठी समस्या आहे. सरकारने ती लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी प्रतिक्रिया वाडा येथील अनिल पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details