महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत; विरार पूर्व नारिंगी येथील चाळीची सुरक्षा भिंत कोसळली

मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीबरोबरच पश्चिम रेल्वेलाही बसला आहे. विरार-नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने विरारहून चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. पावसामुळे विरारचे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. विरारच्या सखल भागात असलेल्या वि.वा कॉलेज बोलिज रोड भागातील नागरी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचबरोबर पावसामुळे विरार पूर्व नारिंगी येथील बैठ्या चाळीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दृश्य

By

Published : Sep 4, 2019, 9:54 PM IST

पालघर- वसईत कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे वाहतुकीला देखील त्याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली असून नालासोपारा-वसई रुळावर पाणी साचल्याने अनिश्चित काळासाठी लोकल सेवा बंद झाली आहे.

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

सुरू असलेल्या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीबरोबरच पश्चिम रेल्वेलाही बसला आहे. विरार-नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने विरारहून चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. वसईत आतापर्यंत ३०० मि.मी हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे सुविधा बंद झाल्याने हजारो प्रवाशी रेल्वे स्थानकात ताटकळत उभे होते, तर काही प्रवाशांनी घरचा रस्ता धरला. पुढील सूचना येईपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून सेवा बंद राहणार असल्याची माहिती लाऊडस्पीकरच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांना देण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे नागरी वस्तींमध्ये शिरले पाणी

वसई-विरार येथे पावसाने जोर धरला. या भागात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे विरारचे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. विरारच्या सखल भागात असलेल्या वि.वा कॉलेज बोलिज रोड भागातील नागरी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्यातच, अनेक ठिकाणचे ड्रेनेज तुंबले असल्याने पाण्याचा निचरा थांबला आहे. त्यामुळे, हे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरले आहे. तसेच अनेक वाहने पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पावसामुळे विरार पूर्व नारिंगी येथील बैठ्या चाळींची सुरक्षा भिंत कोसळली

काल सकाळपासून रौद्ररुप धारण केलेल्या पावसामुळे विरार पूर्व नारिंगी येथील बैठ्या चाळीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. यावेळी नाल्यालगतच्या सुरक्षाभिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नाल्यालगतची भिंत कोसळल्याने नाल्याचे पाणी चाळींमधल्या घरात शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details