महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये वीकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद - Weekend lockdown in palghar

शनिवारी वसई-विरारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र शहरवासीयांचा हा उत्साह रविवारी किंचित मावळलेला दिसला. शनिवारच्या तुलनेत रविवारी वसई-विरारच्या रस्त्यावर नागरिक ये-जा करताना दिसत होते.

Weekend lockdown
Weekend lockdown

By

Published : Apr 18, 2021, 8:30 PM IST

पालघर/विरार - राज्य सरकारने घोषित केलेल्या विकेंंड लॉकडाऊनला शनिवारी वसई-विरारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र शहरवासीयांचा हा उत्साह रविवारी किंचित मावळलेला दिसला. शनिवारच्या तुलनेत रविवारी वसई-विरारच्या रस्त्यावर नागरिक ये-जा करताना दिसत होते.

विरार-ग्लोबलसिटीतील मोकळ्या रस्त्यावर रविवारी सकाळी अनेक जण प्रभात फेरी आणि व्यायाम करताना दिसत होते. विरार पूर्व भागातही सकाळपासून काही नागरिकांत 'रविवारचा मूड' होता. त्यामुळे अगदी किंचित प्रमाणात शहरातील गल्लीबोळातील रस्त्यावर नागरिकांची ये-जा होती.

अशीच स्थिती दुकानांबाबतही होती. शहरातील गल्लीबोळातील दुकाने 'पुढून बंद; मागून सुरू' ठेवण्यात आल्याने गरजवंतांच्या नजरा अशा दुकानांच्या शोधात भिरभरताना दिसत होत्या. तसेच चिकन-मटणप्रेमींची गरज बंद शटर व मागल्या दाराने पूर्ण केली जाताना दिसत होती. विरार मनवेल पाड़ा-कारगिल नगर अशा आतल्या परिसरात काही दुकानांत हा 'चोरीचा मामला' बिनधास्त सुरू होता. तर विरार पश्चिम येथील बोळींज व एमी. बी. इस्टेट परिसरातील चिकन-मटण दुकानांतूनही चिकन-मटणप्रेमींची गरज भागवली जात होती.

दरम्यान, वसईतील कोळीवाड़ा-हाथीमोहल्ला या परिसरातील काही भागांतही अशीच स्थिती होती. अशी माहिती काही जागरूक नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे शनिवारच्या तुलनेत रविवारी पोलीस बंदोबस्त व गस्तही सकाळपासून कमी होती, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते.

ABOUT THE AUTHOR

...view details