पालघर- '२६ गाव पाणीपुरवठा योजने'अंतर्गत बांधण्यात आलेली ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. माहीम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधण्यात आली होती. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली.
निकृष्ट बांधकामामुळे ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली - water tank fraud
टाकीचे बांधकाम झाल्यापासून आत्तापर्यंत तिच्यात पाणी भरण्यात आले नव्हते. मात्र, मंगळवारी रात्रच्या सुमारास पाणी भरताच ही टाकी कोसळली. टाकी कोसळली तेव्हा तीन प्रवासी टाकी जवळील रस्त्याने जात होते...
घटनेच्या वेळी तीन प्रवासी टाकी जवळील रस्त्याने जात होते. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. पाच-सहा वर्षांपूर्वी ही टाकी बांधण्यात बांधण्यात आली होती. मात्र, टाकीचे बांधकाम झाल्यापासून आत्तापर्यंत या टाकीत पाणी भरण्यात आले नव्हते.
मंगळवारी सकाळी टाकीत पाणी भरले असता रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली. टाकी कोसळली असात परिसरात मोठा आवाज झाला, त्यामुळे नागरिक धावत घराबाहेर आले. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळली आहे. टाकी बांधताना हलक्या दर्जाचे स्टील वापरल्यामुळेच ती पडली. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.