पालघर (वाडा) - राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसाचा कहर जिल्ह्यातही चालू आहे. यातच येथील वाडा तालुक्यातील पाली आयटीआयला पिंजाळनदीला आलेल्या पुराचा फटका बसला असताना शेजारील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीमध्ये काल (रविवारी) पाणी घुसले.
पालघरमध्ये पावसाचा कहर; वाडा तालुक्यातील मनोर गावात शिरले पाणी - palghar
राज्यात विविध ठिकाणी बरसत असलेल्या पावसाचा पालघर जिल्ह्यातही कहर चालू आहे. यातच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाली आयटीआयला फटका पिंजाळनदीचा फटका बसला असताना शेजारील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीत काल (रविवारी) पाणी घुसले.
तर रविवारी सुट्टी असल्याने या शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीत किती विद्यार्थी होते, याचा तपशील मिळाला नाही. पिंजाळनदीच्या पुराचा वेढा पडल्याचा व्हिडिओही सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. त्याप्रमाणेच हातनदी, सूर्या नदी व वैतरणा नदीला आलेल्या महापूरामुळे पालघर मनोर गावातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
त्यासोबतच पालघर-मनोर रस्त्यावरील सन सिटी काँप्लेक्स तसेच सखोल भागातील 10 ते 15 घरात 5 फुटापर्यंत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. या अगोदरही काही वर्षांपूर्वी मनोर गावाला पुराचा फटका बसला होता.