पालघर(वाडा) - मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज(३ ऑगस्ट) समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
पालघरमधील सागरी भागातील घरांमध्ये पाणी शिरायला सुरूवात; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा - आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष पालघर
समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यातील सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून नाले, ओढे, गटारे, पूर्ण भरून वाहत आहेत. यामुळे सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगून वृध्द, लहान मुले, तसेच घरातील इतर सदस्यांना बाहेर कृपया पाठवू नये, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
तसेच समुद्र किनारी भागात जोरदार वारे, जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण किंवा आपले सहकारी यांना समुद्र किनारी,खाडी किनारी, लहान मोठ्या धबधब्यांच्या पाण्यात न जाण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.