महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमधील धामणी आणि कवडास धरणांतून १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - सुर्या प्रकल्प

मुसळधार पावसामुळे सुर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

धरण

By

Published : Jul 31, 2019, 8:24 PM IST

पालघर - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बहुतांश धरणात पुरेसा पाणी साठा झाल्यामुळे अतिरिक्त पावसामुळे धरणातून पाणी सोडले जात आहे. धामणी आणि कवडास धरणांतूनही १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे.

धामणी आणि कवडास या धरणांतून १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि पालघर या भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सुर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धामणी धरण ८८.४८ टक्के भरले असून धरणाचे पाचही दरवाजे ७० सेंटिमीटरने उघडले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून १७४३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details