महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बँक ऑफ बडोदाकडून अनाथ आश्रमाला वॉटर कुलरची भेट - आभार

नालासोपारा पूर्वेकडील नारायण चंद्र ट्रस्टच्या आश्रमाला देना बँक उर्फ बँक ऑफ बडोदा यांच्या ११२ व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेकडून वॉटर कुलरची भेट देण्यात आली.

वॉटर कुलर

By

Published : Aug 6, 2019, 11:14 AM IST

पालघर - नालासोपारा पूर्वेकडील नारायण चंद्र ट्रस्टच्या आश्रमाला देना बँक उर्फ बँक ऑफ बडोदा यांच्या ११२ व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेकडून वॉटर कुलरची भेट देण्यात आली. यावेळी नगरसेवक किशोर पाटील, किसन बंडागळे, संगीता भेरे, रजनी पाटील, मीनल पाटील नारायण चंद्र ट्रस्टचे संचालक विजय सराटे, बँकेचे शाखा व्यवस्थापक दिवाकर झा, कल्पना पारेख, लक्ष्मीकांत मिश्रा, देना बँक उर्फ बँक ऑफ बडोदाचे अधिकारी हिरेन पटेल, अमित कोळी, अस्मिता बार्वेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

वॉटरकुलरची भेट


नालासोपारा येथील नारायण चंद्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.नारायण मालपाणी हे ट्रस्टच्या माध्यमातून अनाथ आश्रम, ज्येष्ठ नागरिक संकुल, महिलांचे वसतिगृह चालवतात. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत मुलांना उन्हाळ्यात शुद्ध व गार पाणी मिळावे म्हणून देना बँक उर्फ बँक ऑफ बडोदा यांनी या आश्रमाला वॉटर कुलरची भेट दिली. त्यांनी दिलेल्या भेटीबद्दल नारायण चंद्र ट्रस्टचे संचालक विजय सराटे यांनी बँकेचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details