पालघर/वसई - वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामण परिसरात पोलिसांनी एका कंटेनर मधून लाखो रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. 26 ऑक्टोंबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करत त्यांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबडमळ कामण येथील रॉयल कंपाऊंड जवळ वालीव पोलिसांनी पहाटे छापा टाकत एका कंटेनर मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी पानमसाला व तंबाखू असा साठा जप्त केला आहे. सदर मुद्देमालाची किंमत 76 लाख 10 हजार 500 रुपये इतकी आहे.