पालघर- राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमधील महापुरात घरे, संसार, दुभती जनावरे, गोठे आदी उध्वस्त झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयाची हानी झाली. गोरगरीब, सर्वसामान्य माणसे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत. कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी वाडा तालुक्यातील इनडक्सन फरनेज आणि वाडा तालुका इंडस्ट्रीज असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 11 लाखाची मदत देण्यात आली.
पालघरमध्ये इंडस्ट्रीज असोसिएशनकडून पूरग्रस्तांना 11 लाखाची मदत
कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी वाडा तालुक्यातील इनडक्सन फरनेज आणि वाडा तालुका इण्डस्ट्रीज असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 11 लाखाची मदत देण्यात आली.
पूरग्रस्तांना 11 लाखाची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 19 ऑगस्टला वाडा इंडस्ट्रीज असोसिएशन सेक्रेटरी मिलींद वाडेकर यांनी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, आमदार अतुल भातखळकर तसेच असोसिएशनचे पदाधिकारी, अमित गर्ग, अजय लालगरिया, श्रावण अगरवाल, अनुराग धवन, रवींद्र अगरवाल आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश देत पूरग्रस्तांना मदत केली.