महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात वाडा पोलिसांची कारवाई - पालघर अवैध गुटखा वाहतूक कारवाई बातमी

अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर पिकअप गाडीवर वाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. यात गाडीसह 3 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

wada-police-take-action-against-illegal-gutkha-transportation-in-palghar
पालघर : अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात वाडा पोलिसांची कारवाई

By

Published : Jan 30, 2021, 8:11 PM IST

पालघर -गुजरातच्या वापीतून भिवंडीकडे अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर पिकअप गाडीवर वाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. यात गाडीसह 3 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण 3 लाख 46 हजाराचा मुद्देमाल जप्त -

पालघर जिल्ह्यातील वाडा-भिवंडी या महामार्गावरील मुसारने गावाजवळ गुजरातच्या वापीतून गुटखा आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाही होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी जीजे 15 एटी 7152 क्रमांकाची पिकअप गाडी रात्री नऊच्या सुमारास ताब्यात घेतली. या गाडीतून 96 हजारांचा गुटख्यासह एकूण 3 लाख 46 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वापी येथे राहणारा 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, काही दिवस आधी तालुक्यातील खनिवली नाक्यावर वापी भागातून भिवंडीकडे जाणाऱ्या टेम्पोट्रकवर वाडा पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत टेम्पो ट्रकसह एकूण 13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. तसचे दोन जणांना कारवाईदेखली करण्यात आली होती.

हेही वाचा - औरंगाबादेत वक्फ बोर्डाच्या जागेवर बिल्डरचा कब्जा, 100 कोटींच्या घोटाळ्याचा जलील यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details