पालघर (वाडा) - बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाडा शाखा ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, खातेधारकांना वेळेत सुविधा मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, अशी मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे. अन्यथा बँकेला टाळं लावू असा इशारा बँकेचे खातेदार करत आहेत.
वाडा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेधारकांचा बँकेला टाळे लावण्याचा इशारा; कामाच्या दिरंगाईमुळे नाराजीचा सूर - bank of maharashtra acount holder warn to bank
बँक ऑफ महाराष्ट्र या वाडा शाखा ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, खातेधारकांना वेळेत सुविधा मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, अशी मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे. अन्यथा बँकेला टाळं लावू, असा इशारा बँकेचे खातेदार करत आहेत.
बँकेत ४ कर्मचारी पुरेसे आहेत. मात्र, त्यातील एक कर्मचारी शाखेत नियमीत येत नसल्याने अतिरिक्त कामाचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडत आहे. संपूर्ण काम संपेपर्यंत कर्मचाऱ्यांना अधिक वेळ उपस्थित थांबावे लागत असल्याचे खातेदारक सांगत होते. पण अधिकृतपणे यावर समस्येवर ते बोलायला बँकेच्या मॅनेजर नकार देत होते.
बँकेचे २५ हजारहून खातेदार असून यातील सर्वाधीक खातेदार आदिवासी भागातील आहेत. बँकेजवळ पार्किंग सुविधा नाही. सुरक्षा रक्षक नाहीत. तसेच कामात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी खातेदार करत आहेत.