महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरसह बुलडाण्यातील दोन नगरपरिषदांसाठी २४ मार्चला मतदान - नगरपालिका

पालघर , सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलडाणा) या ३ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी २४ मार्च २०१९ ला मतदान होणार आहे.

पालघर नगरपरिषद

By

Published : Feb 22, 2019, 11:09 AM IST

मुंबई - पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलडाणा) या ३ नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मार्च २०१९ ला मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच मतमोजणी २५ मार्च रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

पालघर नगरपरिषद

पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या नगरपरिषदांची मुदत एप्रिल २०१९ मध्ये संपत आहेत. नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान २४ मार्च २०१९ ला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत होणार आहे. मतमोजणी २५ मार्च २०१९ ला सकाळी १० वाजता सुरू होईल. या तिन्ही नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जाणार आहेत. ३ व ४ मार्च २०१९ या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी ८ मार्च २०१९ ला होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

पालघर नगरपरिषद

ABOUT THE AUTHOR

...view details