पालघर- जिल्ह्यातील गडचिंचले गावात चोर असल्याचे समजून तीन निरपराध प्रवाशांना जमावाने ठार केल्याची घटना अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही नागरिकाने, गावकऱ्यांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींना अशाप्रकारे हल्ला करून ठार करणे, कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.
चोर समजून निरपराध प्रवाशांना जमावाने ठार मारणे चिंताजनक - विवेक पंडित - पालघर कोरोना अपडेट्स
कोणत्याही नागरिकाने, गावकऱ्यांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींना अशाप्रकारे हल्ला करून ठार करणे, कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.
चोर समजून निरपराध प्रवाशांना जमावाने ठार मारणे चिंताजनक - विवेक पंडित
कोरोनामुळे पोलिसांना अतिशय बिकट परिस्थिती काम करावे लागत आहे. त्यामुळे ज्यांना अशा अनोळखी व्यक्तींबद्दल संशय आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच जिल्हाधिऱ्यांनी गावा-गावांतील पोलीस पाटलांना सक्त ताकीद देऊन गावांमध्ये जनजागृती करावी अन्यथा कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होईल, अशी भीतीही विवेक पंडित यांनी व्यक्त केली आहे.