पालघर- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी कार्यकर्त्यांना केले. आज (शनिवारी) वाडा येथे विष्णू सवरा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - मंत्री विष्णू सवरा - birthday vishnu savra
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी कार्यकर्त्यांना केले.
गेली चाळीस वर्षे मंत्री सवरा हे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे नेतृत्व हे या जिल्ह्याला लाभले. सहा वेळा निवडून पहिल्यांदाच या भागाला त्यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याचे गौरवोद्गार भाजपचे विस्तारक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले यांनी काढले. तर मंत्री विष्णू सवरा यांनी आपल्या मनोगतात पक्षात ४० वर्ष काम करत असताना कार्यकर्त्यांचे प्रेम लाभल्याचे सांगितले.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे. लोकहिताची कामे करून जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा बाजी मारायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.