लखनऊ -उत्तरप्रदेश येथील एसटीएफ (STF of Uttar Pradesh) आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) यांनी पालघर येथील तरूणीची हत्या करून (Varsha Goyal Murder Case) फरार असलेला आरोपी राज कुंवर सिंह उर्फ विशाल सिंह (Raj Kunwar Singh alias Vishal Singh)याला संयुक्त कारवाईत गोरखपूर येथून ताब्यात घेतले आहे.
- आरोपीला घेतले ताब्यात -
पालघरमध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी यूपी पोलिसांशी त्याला ताब्यात घेण्यासाठी सहकार्य मागितले होते. त्यानंतर गोरखपुर एसटीएफने आपली शोध मोहिम सुरू केली होती. आणि गोरखपूर पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या पर्यटन कार्यालयाच्या जवळून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 400 रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
- सोनहा येथील परसोहिया येथील निवासी -