पालघर/विरार - विरार पूर्वेकडील परिसरात घरफोडी करणा-या सराईत आरोपीला विरार पोलिसांनी अटक केली आहे. विक्रांत शंकर कदम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला अटक - गुन्हेगारी विषयी बातम्या
विरार पूर्वेकडील परिसरात घरफोडी करणा-या सराईत आरोपीला विरार पोलिसांनी अटक केली आहे.
विरार परिसरातील घरफोडी चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागिय पोलीस अधिकारी रेणुका बागडे, यांनी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, विरार पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना सूचना दिल्या होत्या.
पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणताही तांत्रिक पुरावा नसतांना कौशल्य पुर्ण तपास करून आरोपी बद्दल गुप्त माहिती मिळवून विक्रांत शंकर कदम ( वय २३ रा. बटरपाडा, पेल्हार फाटा,) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्याने विरार पोलीस परिसरात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३६,७०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस करत आहेत.