महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Virar Crime News : विरारमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, प्रियकराला नग्न करून केली मारहाण - 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

मुंबईजवळील विरारमध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. दोघा आरोपींनी एका तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करत तिच्या प्रियकराला विवस्त्र करून मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी दोघाही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

Crime
Crime

By

Published : Mar 24, 2023, 8:27 AM IST

विरार (पालघर) :पालघर जिल्ह्यातीलविरारमध्ये प्रियकरासह संध्याकाळी फिरायला गेलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी या प्रकरणी तडक कारवाई करत अवघ्या काही तासांत या दोन आरोपींना अटक केली आहे.

सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल : यश शिंदे आणि धीरज सोनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी 22 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. विरार येथील साईनाथ नगर परिसरातील रहिवासी असलेल्या दोघांविरुद्ध पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी संध्याकळच्या सुमारास विरार येथील एका डोंगरावर हा प्रकार घडला. तरुणीचा प्रियकर नग्न अवस्थेत डोंगराखाली आला असता काही नागरिकांनी त्याला पाहिले व त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला : बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पीडित तरुणी ही आपल्या प्रियकर मित्रासोबत विरार पूर्वच्या साईनाथ नगर येथील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेत तेथे दबा धरून बसलेल्या दोन आरोपीनी तरुणीचे फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी आणि तरुणीचा प्रियकर यांच्यात वादावादी झाली. दोघा आरोपींनी तरुणाला बिअरच्या रिकाम्या बाटलीने मारहाण केली. त्यांनी तरुणाला विवस्त्र करून पट्ट्याच्या साहाय्याने झाडाला बांधले. त्यानंतर त्यांनी त्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला.

आरोपींना 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी :पीडित तरुणी व तिच्या प्रियकराने विरार पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह, लूट, मारहाण अश्या विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल त्यांना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा :Sonu Nigam News : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरात 72 लाखांची चोरी, कामावरून काढलेल्या ड्रायव्हरला संशयावरून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details