महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये विकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन; दुकाने सुरू, नागरिकही रस्त्यावर - वसई विरार लॉकडाऊन न्यूज

वसई-विरारमध्ये शनिवार व रविवार कडक विकेंड लॉकडाऊन पाळण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अनेक दुकानदार शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. नागरिकही रस्त्यावर दिसत आहेत.

vasai
vasai

By

Published : Jul 5, 2021, 7:51 AM IST

पालघर - वसई-विरारमध्ये व्यापारी वर्ग तसेच दुकानदारांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा रेट हा दररोज वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने वसई विरारचा समावेश तिसऱ्या स्थरामध्ये केला आहे.

वसई विरारमध्ये विकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन

विकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन

शनिवार व रविवार कडक विकेंड लॉकडाऊन पाळण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अनेक दुकानदार शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वसई-विरार, नालासोपारा शहरातील अनेक फेरीवाले व दुकानदारांनी आपली दुकाने व व्यवहार सुरळीत ठेवले आहेत. तर अनेक जण दुकानाचे शटर बंद ठेवून चोरट्या पद्धतीने सेवा देत आहेत. त्यामुळे वसई-विरारमध्ये विकेंड लॉकडाऊनचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे.

पोलिसांची कारवाई

लॉकडाऊन असतानाही अनेक नागरिक खरेदीसाठी घराबाहेर फिरताना दिसत आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. विकेंड लॉकडाऊन असतानाही काही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. विरार पश्चिमेकडील जकातनाका येथे असलेल्या म्हाडाच्या रोडवर नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास अनेक बेजबाबदर नागरिक मॉर्निंग वॉक व जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडलेले दिसतात. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या संख्येवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यासाठी शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. मात्र, पालघर, विरारमध्ये काही नागरिक विकेंड लॉकडाऊचे पालन करताना दिसून येत नाहीत.

महाराष्ट्रात 9,336 रुग्णांची भर, 123 मृत्यू

मुंबईमधील धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रविवारी (4 जुलै) चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत धारावीत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रात रविवारी (4 जुलै) नवीन 9,336 कोरोना रुग्णांची भर पडली. 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवीन 3,378 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,48,693 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,23,225 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 1,23,030 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे.

हेही वाचा -MAHARASHTRA BREAKING : आज विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

ABOUT THE AUTHOR

...view details