पालघर - लॉकडाऊनच्या काळात जप्त करण्यात आलेली वाहने वसई पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार वाहनमालकांना परत देण्यास सुरुवात झाली आहे. जप्त वाहने पावसाळ्यात खराब होऊ नये तसेच वाहनांची सुरक्षितता लक्षात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी हा निर्णय घेतलाय. वसई तालुक्यात येणाऱ्या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी असे एकूण ३ हजार ३३२ वाहने जप्त केली होती. मात्र आता काही अटींवर ही वाहने मालकांना परत देण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमध्ये जप्त केलेली वाहने परत देण्यास सुरुवात - palghar police
लॉकडाऊनच्या काळात जप्त करण्यात आलेली वाहने वसई पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार वाहनमालकांना परत देण्यास सुरुवात झाली आहे. जप्त वाहने पावसाळ्यात खराब होऊ नये तसेच वाहनांची सुरक्षितता लक्षात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी हा निर्णय घेतलाय.
लॉकडाऊनमध्ये जप्त केलेली वाहने परत देण्यास सुरुवात
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख लक्षात घेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, आता हळूहळू सर्व सेवा पूर्ववत होत असल्याने वाहने परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कागदपत्रे तपासून पोलिसांकडून वाहने परत देण्याची प्रक्रिया सुरू झालीय. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत.