महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची जगप्रसिध्द सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर - सुकेळी बनवणारे वसईचे शेतकरी पायस रॉड्रिग्ज

देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आणि पालघर जिल्ह्यातील वसईची सुकेळी प्रसिद्ध.. मात्र सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर..

वसईची जगप्रसिध्द सुकेळी

By

Published : Nov 11, 2019, 8:22 PM IST

पालघर - जिल्ह्यातील हिच वसईची केळी ही 'सूकेळी'च्या रूपाने सगळीकडे ओळखली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे वसईतील केळींवर आलेल्या रोगांमूळे शेतकरी हवालदील झाला असताना, आता परतीचा पाऊस अजून मुक्कामी असल्यामुळे वसईतील सुकेळीवर संक्रांत आली आहे. पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही खास ओळख. मात्र या सुकेळीची चव अजुनही खूद्द वसईकरांना कळलेली नाही, याबद्दल शेतकरी खंत व्यक्त करतात.

सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची जगप्रसिध्द सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर

हेही वाचा... संजय राऊत लीलावती रुग्णालयात, सायंकाळी करण्यात येणार अॅन्जीओग्राफी

केळींमध्ये विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असल्याने ही केळी पौष्टिक असतात, त्याची आंबटगोड चवही चांगली असते. मात्र त्याबद्दल अजूनही जागरुकता होण्याची गरज आहे, असे मत 'नंदाखाल' येथील पायस रॉड्रिग्ज हे शेतकरी सांगतात. परतीचा पाऊस लांबल्याने पायस यांचे तब्बल एक लाखांचे नुकसान झाले आहे. पायस रॉड्रिग्ज यांचे आजोबा हा सूकेळी बनविण्याचा व्यवसाय करत असत. त्यांची तीसरी पिढी सध्या याच व्यवसायात असून वसईची सूकेळी इतिहासजमा होण्यापासून वाचविण्यात त्यांचा मोलाचा हात आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी म्हणून ते गेली काही वर्ष सुकेळी बनवित असतात. किलोला 500 रूपये, तर गावठी राजेळी 800 रूपये असे वेगवेगळ्या प्रतिनूसार भाव या सुक्यामेव्याला असतात.

हेही वाचा...जयपूरच्या राजमहालात प्रवाशांनाही करता येणार मुक्काम ; भाडे ऐकून वाटेल आश्चर्य

सुकेळी बनवण्याची पद्धत

केळीचे लोंगर कापल्यावर उतरवलेला घड सामान्य वातावरणात ठेवला जातो. त्याचा चीक पूर्णपणे निघून गेल्यानंतर मातीच्या रांजणात सूक्या गवतात ठेवून त्यावर दुसरे मातीचे रांजण ठेवले जाते. केळी पिकवण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे त्यात भाताचे तूस व शेणी यांचा विस्तव करून ऊब देणे. तीन-चार दिवसांत केळी पिकली की ती रांजणातून बाहेर काढली जातात. नंतर ती सोलून उन्हात सुकवली जातात. त्यानंतर कडक उन्हात ती केळी सुकवली जाते. कारवीच्या मांडव घालून त्यावर ही सोललेली केळी पसरवली जातात. आठवडाभर रोज ती उन्हात दिवसभर सुकवायला मांडवावर घालायची व संध्याकाळी उन्हे उतरू लागली की, सूर्यास्ताआधी काढून पून्हा टोपलीत रचून ठेवली जाते. या केळीला जी चव असते, ती येण्यामागे शेतकऱ्यांचे एवढे परिश्रम असतात.

हेही वाचा...शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांसोबत विद्यार्थ्यांची झटापट

सोनेरी रंगाची ही सुकलेली केळी केळीच्याच सुकलेल्या पानामध्ये म्हणजेच वावळीमध्ये बांधून विक्रीसाठी नेली जातात. या प्रक्रियेत केळीतला नैसर्गिक गोडवा फळामध्ये पूर्णपणे मुरल्याने या केळाची चव टिकून राहते. किलोवर त्याची विक्री केली जात असली तरी ती आता फार कमी शेतकरी बनवत आहेत. साधारण वातावरणात दोन महिने ही सुकवलेली केळी राहतात. फ्रीजमध्ये सहा महिन्यांपर्यंत त्यांची चव आणि रंग चांगला राहतो. यावर्षी परतीचा पाऊस अद्याप ठाण मांडून बसल्याने केळी सुकवताना पुरेसे ऊन पडले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत केळी उत्पादकाला अन्य पिकांप्रमाणे नुकसानभरपाई मिळत नसल्याने हा व्यवहार काहीसा बिनभरवशाचा आहे, अशी खंत शेतकरी व्यक्त करतात. महानगरपालिका व शासनानेही शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे करावा जेणेकरून शेतकर्‍यांना एक चांगले व्यवसायाचे साधन निर्माण होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details