पालघर - वसईतील एका महिलेची ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच हजार रुपयांच्या ड्रस ऐवजी जून्या साड्या या महिलेला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या महिलेसोबत दोनदा असाच प्रकार झाला आहे.
कशी झाली फसवणूक -

वसई पश्चिमेला राहणाऱ्या गीता गुप्ता या महिलेने फेसबुकवरील एका पेजवरून पाच हजार रुपयांचा ड्रेस ऑर्डर केला होता. दोन दिवसांत त्याची डिलीवरीही मिळाली. मात्र, पार्सल उघडताच त्यात रद्दीत टाकलेल्या साड्या मिळाल्या. चुकून हे पार्सल बदलले असल्याचा अंदाज लावून गुप्ता यांनी पुन्हा ड्रेस ऑर्डर केला. मात्र, पुन्हा त्यांना रद्दीतील साड्यांचेच पार्सल मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ -
कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शॉपिंगच्या पर्यायांकडे वळले आहेत. मात्र, यात फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागच्याच आठवड्यात नाशिकमध्येही अशीच घटना समोर आली होती. एका व्यक्तीला फेशियल किट ऐवजी पार्सलमध्ये दगड मिळाला होता. तर मीरा-भाईंदर येथे एका महिलेला ऑनलाइन मोबाइल खरेदी केल्यावर मोबाइल ऐवजी साबण मिळाला होता.