महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरार महापालिकेला मिळणार जनसंपर्क अधिकारी - वसई पालिका आयुक्त डी. गंगाथरन

वसई-विरार महानगरपालिकेमध्ये जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

वसई-विरार
वसई-विरार

By

Published : Jun 13, 2020, 3:37 PM IST

विरार (पालघर)- वसई-विरार महानगरपालिकेमध्ये जनसंपर्क अधिकारी नेमण्याच्या मागणीसाठी आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. पुढील आठवड्यात जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वसई-विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी महानगरपालिकेमध्ये समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता. नवनियुक्त पालिका आयुक्त डी. गंगाथरन यांनी 4 जून 2020 ला पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, या पत्रकार परिषदेला अनेक प्रमुख व ज्येष्ठ पत्रकारांना डावलण्यात आले होते. तर काहींना कळवण्यात आले नव्हते. यावर प्रसार माध्यमांतून टीका करण्यात आली होती. पुढील काळात असे प्रसंग येऊ न देता जनसमन्वयातील कमतरता दूर करण्यासाठी ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस्’ महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई यांनी पालिका आयुक्त डी गंगाथरन यांना जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला असून पुढच्या आठवड्यात पालिकेसाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येईल, असे आयुक्तांनी पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई यांना सांगितले.

त्यामुळे वसई-विरारमधील पत्रकारांना जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व बातम्या दिल्या जातील. तसेच मी कोणत्याही पत्रकारांच्या विरोधात नाही, माझे अनेक पत्रकार मित्र आहेत तरी पत्रकारांनी कृपया गैरसमज करून घेऊ नयेत, लवकरच त्यांना गोड बातमी दिली जाईल, असे पालिका आयुक्त डी. गंगाथरन यांनी सांगितले. या तातडीने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल एनयुजे महाराष्ट्राच्या वतीने अध्यक्ष शीतल करदेकर यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details