महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई विरारमधील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा - मुंबई अहमदाबाद अतिक्रमण

युक्त आशिष पाटील यांनी पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना 24 तासांचा 'अल्टीमेटम' देत प्रभागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्काशीत करण्याचे निर्देश जारी केले. तसेच या कारवाईचा अहवाल पालिका मुख्यालयात एका आठवड्यात यादीसह सादर करण्याचे निर्देशही दिले होते.

अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा

By

Published : Jan 22, 2021, 10:47 AM IST

पालघर/नालासोपारा- वसई विरार महानगरपालिकेच्या एफ प्रभागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या पेल्हार मधील उमर कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामे आहेत. या बांधकामांवर गुरुवारी सकाळी तोडक कारवाई करून अनेक अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाधरण यांच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील, सीयूसी पथकाचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव, एफ प्रभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांच्या पथकाने ही तोडक कारवाई केली. या कारवाईत आरसीसी बांधकाम, आरसीसी बीम बांधकाम, आरसीसी बांधकाम (तयार गाळे), आरसीसी बांधकाम तोडण्यात आले. सदर कारवाईत एकूण मिळून 35 हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा
२४ तासांच्या अल्टीमेटमनंतर कारवाई-

मनपा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अभय मिळत असल्याचा आरोप नेहमी केला जातो. दरम्यान बुधवारीच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना 24 तासांचा 'अल्टीमेटम' देत प्रभागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्काशीत करण्याचे निर्देश जारी केले. तसेच या कारवाईचा अहवाल पालिका मुख्यालयात एका आठवड्यात यादीसह सादर करण्याचे निर्देशही दिले. दरम्यान या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्यास प्रभागातील अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही पाटील यांनी दिली आहे. याच आदेशानुसार गुरुवारी उमर कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामावर ही तोडक कारवाई झाली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details