पालघर - वसई विरार शहरातील रुग्णसंख्येने 24 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहेत. शुक्रवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 163 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वसई विरारमध्ये शुक्रवारी 163 कोरोनाबाधितांची नोंद, तर 8 रुग्णांचा मृत्यू - vasai virar corona
शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 121 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी 163 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 24 हजार 183 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 121 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी 163 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 24 हजार 183 वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 482 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 21 हजार 948 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले. सध्या 1 हजार 753 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.