पालघर- संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच मंगळवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 87 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई विरारमध्ये 24 तासांत 87 कोरोनाबाधितांची नोंद; तर उपचारादरम्यान पाच रुग्णाचा मृत्यू - corona update
मंगळवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 87 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Corona update vasai virar
पालिका क्षेत्रात 87 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार मध्ये एकूण कोरोना रुग्णांनी 22 हजार 378 आकडा पार केला आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 444 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 19 हजार 875 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 59 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.