महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसईत लॅपटॉप व मोबाईल चोरट्याला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

नोकरीचे आमिष दाखवून लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या एकाला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याकडून चोरलेला डेल कंपनीचा लॅपटॉप व रियल मी कंपनीचा मोबाईल, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

By

Published : May 4, 2021, 8:53 AM IST

Vasai railway police thief arrest news
वसई रेल्वे पोलिसांनी लॅपटॉप व मोबाईल चोरट्याला अटक केली

पालघर(वसई) - वसई रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाचा लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला अटक केले आहे. महेंद्रकुमार सैनी (वय ३४, रा.अंधेरी), असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला लॅपटॉप व मोबाईल जप्त केला आहे.

वसई रेल्वे पोलिसांनी लॅपटॉप व मोबाईल चोरट्याला अटक केली

आरोपीने सफाळे येथील एका तरुणाला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. त्याजवळ असलेला लॅपटॉप सोबत घेऊन विरार रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलविले. तिथे आरोपीने लॅपटॉपवर काम करण्याचा बहाणा करून तक्रारदार तरुणाला झेरॉक्स काढण्यासाठी पाठवले. ही संधी साधून तरुणाचा मोबाईल व लॅपटॉप घेऊन तो पसार झाला होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने हा आरोपी गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. आरोपी हा बोरिवली रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या गाडीमध्ये गावी जाण्यासाठी बसला होता. मात्र, पोलिसांच्या पथकाने त्याला धावत्या ट्रेनमधून अटक केली. त्याकडून चोरलेला डेल कंपनीचा लॅपटॉप व रियल मी कंपनीचा मोबाईल, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details