पालघर - वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रॅली काढली आणि जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
लोकसभा निवडणूक : पालघरमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींचा उमेदवारी अर्ज दाखल - सुरेश पाडवी
पालघरमधून आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पाडवी यांनी अर्ज भरण्यापूर्वी हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या समर्थकांसह रॅली काढली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाजत-गाजत वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महिनाभरापूर्वी पालघर येथील आंबेडकर मैदानात आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा झाली. त्यानंतर आघाडीही पालघर लोकसभेची जागा लढवणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळेच पाडवींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.