पालघर- संत सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती आज पालघर येथे बंजारा समाज बांधवांनी उत्साहात साजरी केली. सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पालघर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्यन हायस्कूल मैदानपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड देखील उपस्थित होते.
पालघरमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी, चौकाला दिले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे नाव - Sant Sevalal Maharaj
संत सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती आज पालघर येथे बंजारा समाज बांधवांनी उत्साहात साजरी केली. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकचे अनावरण विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
संपादीत छायाचित्र
आमदार राठोड यांच्या हस्ते पालघर-माहीम रस्त्यावर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौक असे चौकाचे नामकरण करून फलकाचे करण्यात आले. यावेळी पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा उज्ज्वला काळे यांसह नगरसेवक तसेच बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्यन हायस्कूल मैदान येथे बंजारा समाज यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा -मच्छीमारांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार - असलम शेख